दोन चाकांवरून दोन टोकांपर्यंतची माणसं वाचणारी माणूसवेडी मुलगी!
स्नेहल घराबाहेर पडते फक्त माणसं वाचायला. मानवी प्रवृत्तींमधील अभिजात निरागस सौंदर्य टिपायला. बस, कार, रेल्वे, विमान वगैरे साधनं असली की, माणसांना फक्त खिडकीतून पाहता येतं. मात्र मोपेड घेऊन लांब भटकंतीवर निघालं की, मानवतेच्या सताड उघड्या प्रवेशदारातून थेट माणुसकीच्या गाभाऱ्यापर्यंत जाता येतं, हा स्नेहलचा अनुभव आहे. 'दोन चाकांवरून दोन टोकांवरचा' हा तिचा सफरनामा कौतुकास्पद आहे!.......